श्री सत्य साईबाबा कन्स्ट्रक्शन्स्, लातूर तर्फे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 10 लाख रुपयाची आर्थिक मदत.

           लातूर.. (डाँ .अमोल शिंदे)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहवानास प्रतिसाद देत श्री. दिलीप रावसाहेब माने यांच्या श्री सत्य साईबाबा कन्स्ट्रक्शन्स्, लातूर च्या वतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ( PM Cares Fund) 05 लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 05 लाख रुपये असे एकूण 10 लाख रुपये ची आर्थिक मदत देण्यात आली.  


कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपययोजना करित आहेत. लॉकडाऊन असल्याने  व्यापार, उद्योग, कारखाने विविध स्वरुपाची कामे बंद आहेत अशा परिस्थिीतीत ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यांची अडचण लक्षात घेता आदर्नीय दिलीपरावजी देशमुख व मा. ना. अमितभैय्या देशमुख यांच्याशी चर्चाकरुन पंतप्रधान सहाय्यता निधी कोविड-19 साठी 05 लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 05 लाख चा धनादेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी श्री सत्य साईबाबा कन्स्ट्रक्शन्स्चे कार्याकारी संचालक दिलीप रावसाहेब माने, संचालक दिनेश दिलीपराव माने व रितेश दिलीपराव माने यांच्यासह एस.डी.ओ. सुनिल यादव व तलसीलदार स्वप्नील पवार हे उपस्थित होते.


Popular posts
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image