लातूर:- ( प्रा. डाँ अमोल शिंदे ) दयानंद कला महाविद्यालयातील सात सहयोगी प्राध्यापकांची ‘प्राध्यापक’ हया सर्वोच्च पदावर पदोन्नती झाली आहे. लातूरच्या शैक्षणीक वर्तुळात दयानंद शिक्षण संस्थेने एक वेगळा ठसा उमटविला आहे. दयानंद कला महाविद्यालय एक आगळे वेगळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नावारूपाला आलेले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची एक समृध्द परंपरा आहे. या महाविद्यालयाने डॉ. शिवराज नाकाडे यांच्यासारखे नामवंत कुलगुरु दिलेले आहेत. थोर साहित्यीक, समीक्षक व अनुवादक डॉ. सुर्यनारायण रणसुभे हे पण याच महाविद्यालयाचे प्राध्यापक राहिले आहेत. यांच्याशिवाय प्रा. चंद्रकांत देऊळगावकर , प्रा. गो. णी. मग्गीरवार, प्रा. गंगाधर हिंगोले, प्रा. सुभाष भिंगे व सध्या स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. जे.एम. बिसेन याच महाविद्यालयाची देण आहेत. हीच परंपरा पुढे चालवत येथील 19 सहाय्यक प्राध्यापकांपैकी तब्ब्ल 07 प्राध्यापकांना प्राध्यापक या पदावर पदोन्नती मिळाली आहे. या महाविद्यालयाचे आणखी एक वैशिष्ठये म्हणजे 19 पैकी 18 प्राध्यापक उच्चविद्याविभूषित म्हणजेच पी.एच.डी धारक आहेत. असे हे महाविद्यालय एक शाखीय (सिंगल फॅकल्टी) कदाचीत महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यलय असावे. सामान्यता: उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पण प्राध्यापक म्हणन्याचा प्रघात आहे. परंतु वास्तविक पाहता प्राध्यापक हे पद अतिविशिष्ठ व सर्वश्रेष्ठ पद आहे. सामान्यता: हे पद उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात, संशोधनकार्यात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्यानांच हे पद मिळत आसते. शैक्षणीक क्षेत्रात हे पद अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाते.
या महाविद्यालयाचे पदोन्नती प्राप्त प्राध्यापक पुढील प्रमाणे आहेत. सर्वप्रथम प्र.प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, डॉ. एस एन जवळगेकर, डॉ. रमेश पारवे, डॉ. सुनील साळुंके, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. अंजली जोशी व डॉ. पुष्पलता अग्रवाल.
वरील सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा. आरविंदजी सोनवणे, मा. ललितभाई शहा, मा. रमेशकुमारजी राठी, सचिव मा. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गिरीष पिलाई, प्रभारी प्राचार्य डॉ. पुनम नाथानी, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, डॉ. श्रीनिवास बुमरेला, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
---------------------------------------------------------------------
“दयानंद कला च्या सात सहयोगी प्राध्यापकांची ‘प्राध्यापक’ म्हणून पदोन्नती - दयानंदची उज्वल परंपरा कायम."