800 कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जिवनावश्यक अन्नधान्यांच्या वस्तू देऊन लातूरच्या विविध संस्थांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली .
लातूर. दि.7.(प्रा अमोल शिंदे व हरीराम कुलकर्णी).. देशात राज्यात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरलेला असुन त्याला रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे आठ दिवसापासून शहर व जिल्हाभरात लॉक डाउन असल्याने अनेक बाहेरगावचे कामगार,मजुर,बेघर असलेल्या लोकाना अन्नधान्य किट यांची मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी आवाहन केले होते त्या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक दृष्टिकोनातून लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेने 500 किट, मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था 100 किट,गोरक्षन संस्था 100 किट,व्यापारी धर्मशाळा संस्थेने 100 किट असे एकुण 800 आन्नधान्याचे किट कोरोनाच्या आपदग्रस्तांना देण्यासाठी लातूरचे जिल्हाधीकारी तथा आपत्कालीन प्रमुख जी श्रीकांत यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी विविध संस्थेच्या पदाधिकारी यानी सूपूर्त केले आहे हे 800 किट महिनाभर 800 कुटुंबाना पुरेल इतकं साहीत्य दिले असुन सामाजीक बांधीलीकी जपून लातूरच्या विविध संस्थेने मदत केल्याने याचा फायदा गोरगरिब, मजुर,आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकाना होणार आहे .
या किट मधे महिनाभर पुरेल इतके साहीत्य दिले असुन गहू,तांदूळ,साखर,तेल,मोहरी जिरे,मिठ,चहापुडा ,खोबरेल तेल,तिखट,हळद,कांदा,बटाटा आदी 26 जिवनावश्यक वस्तुचा समावेश असनार आहे
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष रमेश राठी,सचिव रमेश बियानी ,सदस्य विशाल अग्रवाल मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव अँड आशिष बाजपाई, गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश इन्नानी,सचिव डॉ अनील राठी,व्यापारी धर्मशाळेचे उपाध्यक्ष रमेशजी राठी,सचिव लक्ष्मीरमण लाहोटी,कोषाध्यक्ष रमेश बियानी, माध्यम सल्लागार हरिराम कुलकर्णी उपस्तीत होते
____________________________
जिल्हाधीकारी यांच्याकडून लातूरच्या शैक्षनीक, सामाजीक संस्थेचे आभार
यावेळी बोलताना जिल्हधिकारी जी श्रीकांत यानी कोरोनाच्या आपदग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूची मदत केली आहे त्या बद्द्ल दयानंद शिक्षण संस्था,गोरक्षन,मारवाडी राजस्थान संस्था,व्यापारी धर्मशाळा यांचे आभार व्यक्त करुन लातूरच्या विविध संस्थेने सामाजिक दृष्टिकोनातून गरजूंना मदत करून वेगळा लातूर पैटर्न निर्मान केला आहे असे यावेळी बोलताना व्यक्त केले. फ़ोटो कैप्शनको. करोनाच्या पाश्वर्भुमीवर लॉकडाऊण मधे गरजूंना मदत म्हणून लातूरातील विविध संस्थांने 800 अन्नधान्याचे किट जिल्हाधीकारी जी श्रीकांत यांच्या कडे सुपूर्त केले त्यावेळी लक्ष्मीरमण लाहोटी ,रमेश राठी,रमेश बियानी,अँड आशिष बाजपाई,दिनेश इन्नानी,विशाल अग्रवाल,डॉ अनील राठी दिसत आहेत..