लातूर( प्रतिनिधी) कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर आज लातूर येथील दयानंद कला माहाविद्यालय प्र.प्राचायॅ डाॅ. एस.पी.गायकवाड यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याची १२९ वी जंयती आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरी केली .भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज 3 मे पर्यत भारतात लाँकडाऊनची घोषणा केली आहे. आज विश्वात परम पुज्य डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते त्या अनुषंगाने प्राचार्य डाँ.शिवाजी गायकवाड सर व कुटूंबाने एक नवा आर्दश समोर ठेवला त्यांनी त्याच्या राहात्या घरी प्रकाशनगर येथे अत्यंत साध्या पध्दतीने बोध्दी सत्व परम पूज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी केली. या वेळेस त्यांची पत्नी सौ. जयमाला गायकवाड, मुलगी प्रिया गायकवाड, मुलगा निखिल गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीत आणण्याचा संकल्प केला. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत सर्व जनतेस व आपल्या स्टाफ , विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहान केले. आशा पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या राहत्या घरी साजरी करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
डाॅ.एस.पी.गायकवाड व कुटूंबांनी सामाजिक भान ठेवत साजरी केली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर १२९ वी जंयती.