शिवजागृती महाविद्यालयात ऑनलाईन कार्यशाळा संपन्न : प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी साधला संवाद.......


नळेगाव: येथील शिवजगृती महाविद्यालयातील 'अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने दि 24 एप्रिल 2020 रोजी महाविद्यालयात 'बौद्धिक संपदा अधिकार आणि पेटंट नोंदणी' या विषयावर महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक व  साधन व्यक्ती म्हणून औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर बेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मा. प्राचार्य डाॅ.
महेश्वर बेटकर  म्हणाले की, "कोणत्याही क्षेत्रातील संशोधन करताना सर्व संशोधकांनी आपल्या संशोधन कार्यामध्ये नाविन्यपूर्ण तत्वांचा व सिद्धांतांचा शोध घ्यावा.  आणि त्यासंदर्भातीलआपले लेखन प्रकाशित करण्यापूर्वी शासनाच्या बौद्धिक संपदा या कार्यालयाशी संपर्क साधून त्याची पडताळणी करून घ्यावी. जेणेकरून आपण केलेल्या संशोधन कार्याचा बौद्धिक संपदा अधिकार आपल्याला मिळेल आणि या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठीसुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल."याप्रसंगी  यांनी आपल्या मनोगतातून बौद्धिक संपदा अधिकार प्राप्त करण्याच्या विविध पद्धतींवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधन कार्यात साधावयाचा विकास विकास व त्यांची जडणघडण  याविषयी मार्गदर्शन केले. हे चर्चासत्र दोन सत्रात संपन्न झाले. दुसऱ्या सत्रामध्ये सहभागी संशोधक, अभ्यासकांनी साधन व्यक्तीशी ऑनलाईन  या विषयासंदर्भातील विविध प्रश्न विचारून आपल्या व
 समस्यांचे निराकरण केले. या कार्यशाळेमध्ये शंभराहून अधिक संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सदरील कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे  प्रमुख व या चर्चासत्राचे समन्वयक डॉ. ओमशिवा लिगाडे यांनी केले. तर आभार  सहसमन्वयक प्रा. अमोल पगार यांनी मानले.


Popular posts
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image