"पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप:''

 वाटप.''


लातूर : आज संपूर्ण जगामध्ये  कोरोना विषाणूचा हाहाकार माजला आहे. भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आटोकाट प्रयत्न केला जात आहे. डॉक्टर व पोलीस यंत्रणा दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे.  सामाजिक ऋणानुबंध लक्षात घेऊन दयानंदशिक्षण संस्थेच्या वतीने आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. बाजारातील   सॅनिटायझर व मास्कचा तुटवडा लक्षात घेता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव मा.श्री. रमेश बियाणी व संयुक्त सचिव मा.सुरेशजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद कला महाविद्यालयातील फॅशन व ड्रेस डिझाईन विभागाच्यावतीने प्रा. सुवर्णा लवंद  यांच्या प्रयत्नांतून मास्क तर दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रयोगशाळेत प्राचार्य डॉ. बुमरेला व डॉ. सातपुते यांच्या प्रयत्नांतून सॅनिटायझर तयार करण्यात आले. लातूर शहरातील एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन, गांधी चौक पोलिस स्टेशन, विवेकानंद पोलीस स्टेशन व लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना तसेच दयानंदशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांस, लातूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्याना,  वाॅचमन व शहरातील नागरिकांस सॅनिटायझर व मास्क देण्यात आले. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यात रोज मोलमजुरी करून आपले संसार चालवतात त्यांना रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजवंत कुटुंबांना किराणा मालाचे कीट वाटप करण्यास्तव लातूर जिल्हाधिकारी  मा. जी. श्रीकांत यांचेकडे जमा केले.
आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप करताना दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, प्रा. डॉ. सुनील साळुंके, डॉ. प्रदीप सुर्यवंशी,  डॉ. संतोष पाटील,डॉ. रामेश्र्वर खंदारे, पोलीस निरीक्षक श्री मिरकले संजीवन....





Popular posts
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image