दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने महापालिका अधिकारी कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप !

दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने महापालिका अधिकारी कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप !



लातूर दि,1: देशात ,  राज्यात कोरोनासंसर्ग मोठ्या प्रमाणात  फोफावत असुन  कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रशासन सध्या विविध पातळीवर प्रयत्न करित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून लातूर येथील  दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  लातूर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे मास्क व सॅनिटायझरचे  वाटप दयानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी व सचिव मा. रमेशजी बियाणी यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी महापालिका  उपायुक्त बोंदर सुदंर, नगरसेवक पप्पू देशमुख, स्वछता निरिक्षक शिंदे, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पूनम नाथानी , उपप्राचार्य प्रा.अनिलकुमार माळी , प्रा.डाॅ.दिलीप नागरगोजे,  डॉ. संतोष पाटील, प्रा.शशीकांत स्वामी,कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव , सुभाष एकतारे, कार्यालयीन अधीक्षक धनराज जोशी, विवेकानंद देशपांडे ,सुशांत उटगे, योगेश येबांडे हे उपस्थित होते.


Popular posts
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image