केंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा पालकमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना.....
करोना संदर्भात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यस आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात लागू शकते हे लक्षात घेता मेडिकल, पॅरामेडिकल,नॉन मेडिकल, आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना सुयोग्य प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने सुरू करावे . या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही करावी. आशा सूचना लातूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
खाजगी क्षेत्रत कार्यरत असणारे वैद्यकीय व्यावसायिक, आयुष डॉक्टर, खाजगी क्षेत्रातील लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ त्याचप्रमाने एनसीसी, एनएसएस, आणि नेहरू युवक केंद्रामधील स्वयंसेवक, निवृत्त वैद्यकीय व्यवसायिक, लष्करातील निवृत्त डॉक्टर, माजी सैनिक,रेड क्रॉस त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन यांची मदत घेण्याची तयारीही ठेवण्यात यावी आणि यातील प्रत्येक प्रवर्गासाठी सुयोग्य असे प्रशिक्षण तातडीने सुरू करण्यात यावे अशा सूचनाही लातूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
--अमित विलासराव देशमुख
(पालक मंत्री, लातूर जिल्हा)