दयानंद कलाच्या वतीने विद्यार्थी-पालक मनोबल संवाद अभियान”



 
लातूर   ( प्रा. डाँ. अमोल शिंदे) संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी दयानंद शिक्षण संस्था सामाजिक ऋणानुबंधही तितक्याच जबाबदारीने जपताना दिसून येते. कोव्हीड-19 मुळे निर्माण झालेल्या या सामाजिक संकटात दयानंद शिक्षण संस्था मास्क-सॅनिटायझरचे वाटप, गरजूंना अन्नधान्य कीट वाटप, विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अध्यापनाची सुविधा उपलब्ध करून देणे यासोबतच मानसिकता जपण्याचेही कार्य करत आहे. समाज सेवेचा एक आगळा वेगळा पॅटर्नच जणू या निमित्ताने दिसून येत आहे. कोव्हीड-19 मुळे लॉकडाऊन परिस्थितीत मानसिक आरोग्यही काहीसे धोक्यात आलेले दिसून येते. काय होईल पुढे? भविष्य काय? घरात सतत बसून असल्याने लोकांमध्ये निराशेची भावना, विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. अशा वेळी त्यांना भक्कम मानसिक आधाराची गरज आहे. हे लक्षात घेऊन दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा. अरविंदजी सोनवणे, मा. ललितभाई शाह, मा. रमेशकुमारजी राठी, सचिव मा. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन व सर्व पदाधिकाऱ्यांनी एक उपक्रम राबविण्याचे ठरविले. दयानंद कला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या सहकार्याने दयानंद कला महाविद्यालयात ‘विद्यार्थी-पालक मनोबल संवाद अभियान’ राबविण्याचे ठरले. यासंदर्भात महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांनी बैठक घेऊन या कार्यात 56 प्राध्यापकांना समाविष्ट करून घेण्यात आले.  या 56 प्राध्यापकांना महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी विभागून दिले. या विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर देणे, सकारात्मक मानसिकतेत ठेवणे, खूपच गरजेचे होते.  शिवाय काही विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबिय अडचणीत असू शकतात तर त्यांना त्यादृष्टीने मदतीचा हात पुढे करता येईल. या पद्धतीने विदयार्थी त्यांच्या पालकांच्या मनापर्यंत पोहचून दिलासा देणारा हा उपक्रम होय. जसे शरीराला कुठे लागले तर आपण मलमपट्टी करतो तसेच मन दुखावले गेले तर आपण भावनिक प्रथमोपचार द्यायला हवा या हेतूतून सगळे प्राध्यापक कामास लागले.  दैनंदिन ‘वर्क फ्रॉम होम’ करत आपल्या कुटुंबोसोबत आपले विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय यांची काळजी घेण्याची ही मोहिम सुरू झाली. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थी व पालक घरी आहेत का? कुठे अडकले आहेत? ते जिथे आहेत तिथेच त्यांनी सुरक्षित रहावे, बाहेर पडणे धोक्याचे आहे. आपण सुरक्षित आहोत हे महत्त्वाचे हे सांगून लॉकडाऊन संबंधी सकारात्मकतेकडे वळवणे, जीवनावश्यक वस्तूंची काही उणीव असेल तर ती कशी भरून काढता येईल यासाठी प्रयत्न करणे, त्यांचे मनस्वास्थ्य ठीक नसेल तर अभ्यासासंबंधी किंवा इतर प्रेरणादायी व्हीडीओ पाठवून तसेच सतत त्याच्यांशी संवाद साधून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत (ते एकटे नाहीत) असा भक्कम मानसिक आधार देण्याचे कार्य या प्राध्यापकांनी केले.
प्राध्यापकांनी  ‘विद्यार्थी पालक मनोबल संवाद’ अभियानांतर्गत जे संवाद साधले त्यात 1700 विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यापैकी लातूर शहरातील 51 विद्यार्थी तर ग्रामीण भागातील 26 विद्यार्थ्यांना अडचणी होत्या. काहींना पालकांच्या हाताचे काम बंद पडल्यामुळे रोजच्या उदरनिर्वाहाची अडचण होती? काही विद्यार्थी किंवा त्यांचे पालक बाहेरगावी अडकले आहेत. त्यामुळे अडचणीत काही विद्यार्थी कोंडल्यासारखे वाटते. म्हणजे निराश तर काही पुढे काय? म्हणून संभ्रमित असे दिसून आले. एका विद्यार्थ्याने त्याच्या घराजवळ असलेल्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली ती पाहवत नाही ही अडचण सांगितली. विद्यार्थ्यांच्या मनातील ही सामाजिक भावना निश्चितच उद्याच्या संवेदनशील नागरिकांची  नांदी होय असे वाटते. अशा विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांच्या अडचणींनुसार वर्गीकरण केले. ज्या विद्यार्थ्यांना अन्न-धान्याची गरज होती त्यांची यादी मा. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनंत गव्हाणे यांच्याकडे देऊन मदत करण्याची विनंती केली.  लातूर शहरामध्ये राहणाऱ्या 51 गरजू विद्यार्थी व त्यांचे कुटुंबिय यांची माहिती महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मा. श्री. सुंदर बोंदर यांच्याकडे देऊन त्यांनाही मदतीची विनंती केली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थी इतके भावनिक झाले होते. त्यांनी आपल्या  भावनिक प्रतिक्रिया दिल्या. काळाची गरज ओळखून गरजू विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांच्या संपर्कात दयानंद शिक्षण संस्था व दयानंद कला महाविद्यालय यापुढेही राहणार असून कोव्हीड 19 च्या परिस्थितीत विद्यार्थ्याचे मनोधैर्य राखून त्यांना मानसिक तसेच आर्थिक आधार देण्याचा हा प्रयत्न करतच राहणार आहे. 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                                                                                     
 
                                                                                                                          
                                                                                                                      


Popular posts
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image