लातूर:- (प्रा डाँ अमोल शिंदे) आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही हा संसर्गजन्य उपद्रव कमी व्हावा म्हणून टाळेबंदी घोषित केली आहे. आपण सर्व काटेकोरपणे ती पाळत आहोत. टाळेबंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदतीचे अवाहन केले आहे . तसेच डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांनी प्रेत्येक शिक्षण संस्थेस विनंती केली आसून त्याच्या विनंतीला मान देऊन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी व सचिव श्री. रमेशजी बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य, विज्ञान व विधी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचार्यांनी एक दिवसाचे वेतन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम साळुंके, दयानंद कला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड व विधी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पुनम नथानी यांनी खारिचा वाटा म्हणून दयानंद शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार मुख्यमंञी साहाय्याता निधीस एकूण रू. 4,09,715/- (अक्षरी रू. चार लाख नऊ हजार सातशे पंधरा फक्त) मुख्यमंत्री निधीकडे वर्ग केले आहे.
दयानंद शिक्षण संस्थाही महाराष्ट्रातील अग्रगन्य शिक्षण संस्था म्हणून ओळखी जाते. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या या संस्थेने सामाजिक ऋणानुबंध हे प्रत्येक आपत्तीस जबाबदारीने जपलेले दिसून येते. कोव्हीड-19 मुळे निर्माण झालेल्या वैश्वीक संकट कालीन परिस्थितीत दयानंद कला महाविद्यालयाने मास्कची निर्मिती केली. आणि दयानंद इन्स्टिट्युट आँफ फॉर्मसी ने सॅनिटायझर ची निर्मिती करून. शिक्षण संस्थेच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, सफाई कामगार, जेष्ठ नागरीक, समाजातील गरजू यांच्यात मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले. टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे रोजच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला. अशा गरजूंसाठी अन्न-धान्य कीटचे वाटप केले. यासोबतच टाळेबंदीमुळे विद्यार्थी किंवा पालक संभ्रमात पडू नये, निराशेकडे झुकू नयेत म्हणून त्यांच्यासाठी विद्यार्थी-पालक मनोबल संवाद अभियान राबविण्यात आले. एकूणच समाजसेवेच्या क्षेत्रात दयानंद शिक्षण संस्थेने एक आगळा - वेगळा पॅटर्न निर्माण केलेला दिसून येतो.
दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालयाने रू. 110348/-, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने रू. 82187/-, दयानंद विज्ञान महाविद्यालयाने रू. 171045/- व दयानंद विधी महाविद्यालयाने रू. 46135/- असे एकूण 409715/- (अक्षरी रू. चार लाख नऊ हजार सातशे पंधरा फक्त) RTGS द्वारे मुख्यमंत्री निधीस वर्ग केले आहेत.
---------------------------------------------------------------------