<no title>कोरोनाग्रस्तांसाठी  “मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीस दयानंद शिक्षण संस्थेच्या  चार महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यानी 4 लाख रूपयांची केली मदत  प्राध्यापक,शिक्षकेत्तर  कर्मचारी यानी 1 दिवसाचा दिला पगार 

 


लातूर ( हरीराम कुलकर्णी  व अमोल शिंदे) आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही हा संसर्गजन्य उपद्रव कमी व्हावा म्हणून टाळेबंदी घोषित केली आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी माननीय  मुख्यमंत्री यांनी आवाहन केले असुन   यांच्या अहवानास प्रतिसाद देऊन दयानंद शिक्षण संस्थेच्या  कला, वाणिज्य, विज्ञान व विधी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचार्यांनी एक दिवसाचे वेतन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम साळुंके, दयानंद कला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड व विधी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पुनम नथानी यांनी खारिचा वाटा म्हणून एकूण रू. 4,09,715/- (अक्षरी रू. चार लाख नऊ हजार सातशे पंधरा फक्त) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे आर. टी.जी.एस.द्वारे वर्ग केले आहे. 


 दयानंद शिक्षण संस्था ही  राज्यातील  अग्रगन्य शिक्षण संस्था असुन शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या या संस्थेने सामाजिक ऋणानुबंध ही तितक्याच जबाबदारीने जपलेला आहे  कोव्हीड 19 मुळे निर्माण झालेल्या संकट कालीन परिस्थितीत दयानंद कलामहाविद्यालयाने मास्कची निर्मिती केली तर आणि दयानंद इन्स्टिट्युट आॅफ फॉर्मसी व फॉर्मसी महाविध्यालयाने सॅनिटायझर ची निर्मिती करुन सामाजिक बांधिलकी म्हणून  शिक्षण संस्थेच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, सफाई कामगार, जेष्ठ नागरीक, समाजातील गरजू यांच्यात मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले. तर टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे रोजच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला. अशा गरजूंसाठी अन्न-धान्य कीटचे वाटप केले आहे.


 हे करित असताना  टाळेबंदीमुळे विद्यार्थी किंवा पालक संभ्रमात पडू नये, निराशेकडे झुकू नयेत म्हणून त्यांच्यासाठी विद्यार्थी-पालक मनोबल संवाद अभियान राबविण्यात आले. एकूणच समाजसेवेच्या क्षेत्रात दयानंद शिक्षण संस्थेने एक आगळा पॅटर्न निर्माण केलेला आहे 
या सामाजिक उपक्रमा बद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण  लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे,उपाध्यक्ष ललीतकुमार शहा ,रमेशजी राठी,सचिव रमेशजी बियानी यानी सर्व महाविध्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.


Popular posts
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image