लातूर:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक 12.06.2020 रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. जमीनीची धूप कमी करण्यासाठी व वृक्षांची संख्या वाढवण्याच्या उदे्शाने दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज पर्यंत असंख्य वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. आपण ज्या परीसरात कार्य करतो त्या ठिकाणी वृक्षांची संख्या जास्त असेल तर सहाजीकच कार्य करण्यास उत्साह निर्माण होतो. तसेच वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावरील उपाय आहे. अशी भावना दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांनी व्यक्त केली. भविष्यात दयानंद ट्री-बँकेची निर्मीती करण्याचा मानस रासेयो विभागाचा आहे. तसेच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि वृक्षसंगोपन या त्रिसूत्री कार्यक्रमाची जोपासना सदैव करण्यात येईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी याप्रसंगी केले.
वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, दयानंद कला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, मराठी विभाग प्रमुख डॉ.शिवाजीराव जवळगेकर, राष्ट्रीय सेवा योजना लातूर जिल्हा समन्वयक तथा रा.से.यो. विभाग प्रमुख डॉ. संतोष पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.युवराज सारणीकर, बीसीए विभागप्रमुख प्रा. शशिकांत स्वामी , डॉ. बळीराम खटाळ, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. प्रेमसागर मुंदडा, कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव व महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचारी, वृक्षसंवर्धन प्रतिनिधी विनायक घोडके आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------------