लातूर : आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही हा संसर्गजन्य प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. आपण सर्वांनी त्याचे पालन काटेकोरपणे करीत आहोत.
कोरोनाच्या लढ्यात अनेकजण काहीनाकाही कार्य बजावत आहेत. लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे समाजाच्या वेदनेशी नाते जुडले आहे. समाजामध्ये निर्माण झालेली वेदना दूर झाली पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्ती आनंदाने, सुखाने, आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. या भावनेपोटी मौजे. गव्हाण ता. रेणापुर जि.लातूर या गावात कोरोनाचा सर्वेक्षण चालू असून श्री. भरत पवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील लोकांचे तापमान (थर्मल स्कॅन) तपासत आहे. तो स्वच्छेने कोरोना योद्धा म्हणून कार्य करीत आहे. यात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक या नात्याने गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करून सामाजिक बांधिलकी श्री. भरत पवार यांनी जोपासली आहे. यापूर्वी त्याने अँटी कोरोना फोर्समध्ये कार्य केले असून यात मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यासाठी लोकांना प्रेरित करून कोरोना विषाणूची जनजागृती केली.
याचाच एक भाग म्हणून दयानंद कला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शिवकुमार राऊतराव यांनी उन्नत भारत अभियानांतर्गत हरंगुळ (बु.), ता.जि. लातूर, डिगोळ तांडा, ता. रेणापूर, जि. लातूर व मोरवाड, ता. रेणापूर, जि. लातूर या सर्व गावांचा कोव्हीड 19 या विषाणुच्या प्रादुर्भावाची तपासणी अंतर्गत सर्वेक्षण करीत आहेत. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे (एन.सी.सी.) लेफ्ट. प्रा. विवेक झंपले यांच्या मार्गदर्शनांतर्गत सेलू, ता. औसा, जि. लातूर, येलोरी, ता. औसा, जि. लातूर व तुपडी, ता. निलंगा, जि. लातूर या सर्व गावांचा कोव्हीड 19 या विषाणुच्या प्रादुर्भावांतर्गत तपासणी सर्वेक्षण चालू आहे.
उपरोक्त कार्याबद्दल प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.संतोष पाटील, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------