काल दिनांक ०८/०६/२०२०रोजी शासकीय विश्रामगृह येथे *जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.अमित देशमुख साहेब* यांना सौ.संगीता प्रवीण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली *शहरातील महिला बचत गटांच्या महिलांनी* मायक्रोफायनान्स कंपनी कडून बचत गटांना व व्यक्तींना वितरित झालेले सूक्ष्म, लघु, उद्योग कर्ज माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात महिला बचत गटाच्या महिलांनी व व्यक्तींनी म्हटले आहे की *गेल्या 4 महिन्यापासून कोरोना महामारीमुळे हाताला काम नाही यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असल्याने पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला* आहे यात मायक्रो फायनान्स कंपनी कडून कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे तसे मोबाइल वर कॉल व SMS येत आहेत तसेच *रिझर्व्ह बँकेने हफ्ते आत्ताच न भरण्याचे आदेश दिले असताना देखील* सदरील फायनान्स कंपन्या हफ्ते भरण्यासाठी बैठका घेत आहेत .बचत गटांतील सर्व महिला आर्थिक अडचणीत आल्याने व कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्जाची हफ्ते कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. *प्रा.प्रवीण कांबळे* यांनी सदरील महिलांच्या अडचणी मा.पालकमंत्री यांना तोंडी सांगितले व निवेदन दिले.निवेदन देतेवेळी *जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.जी.श्रीकांत साहेब* यांना मा .पालकमंत्री श्री.अमित देशमुख साहेब यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीसोबत बोलून यांच्या मागणी संदर्भात विचार करण्यासंबंधीचे आदेश दिले यावेळी संतोषी सोनवणे,अलका कांबळे, लक्ष्मीबाई शिंदे,अरुणा बनसोडे,विमलबाई लगाडे,सविता कांबळे, कमलबाई गायकवाड, अनुसायबाई मादळे,आशाबाई कांबळे, गीता कांबळे, सई लामतुरे,शारदा लामतुरे,तनुजाताई कांबळे,राजू गवळी ,यशपाल सूर्यवंशी, दयानंद कांबळे, किरण साबळे,पांडुरंग भालेराव आदी मोठ्या संख्येने महिला व व्यक्ती उपस्थित होते.
*महिला बचत गटांच्या महिलांनी पालकमंत्री श्री.अमित देशमुख साहेब यांच्याकडे केली कर्ज माफ करण्याची मागणी.