मा. रमेशजी बियानी यांच्या हस्ते दयानंद महाविद्यालयात निर्जंतुकीकरण मशीनचे उद्घाटन .महाविद्यालय निर्जंतुकी करण्यास सुरवात.

                                           


       लातूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण, उच्च शिक्षण विभागाच्या व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सूचीत केल्या प्रमाणे शैक्षणीक वर्ष - 2020-21 हे शुक्रवार दिनांक 26.06.2020 पासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव मा. रमेशजी बियाणी, उपाध्यक्ष मा. आरविंदजी सोनवणे, मा. ललितभाई शहा, मा. रमेशकुमारजी राठी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व पालक यांच्या स्वास्थ्याचा विचार करता दयानंद शिक्षण संस्थेने कोरोना विषाणू निर्जंतुकीकरणासाठी संस्थेअंतर्गत येणाऱ्या कला, विज्ञान, वाणीज्य, विधीसह अन्य सर्व महाविद्यालयासाठी प्रत्येकी 02 वेगवेगळया प्रकारच्या मशीन दिल्या आहेत. यामध्ये ऑफीस, फर्नीचर युक्त रुम्सचे निर्जंतुकीकरण व वर्गखोल्या निर्जंतुकीकरणाचे कार्य सहज शक्य होते. 


              या निर्जंतुकीकरणाचे महत्त्वपुर्ण कार्याची सुरुवात दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. रमेशजी बियाणी यांच्या शुभहस्ते दयानंद कला महाविद्यालयात करण्यात आले. या मशीनच्या माध्यमातून दररोज निर्जंतकीकरण कार्य महाविद्यालयीन स्तरावर केले जाणार असून काही मिनीटातच आपण संपुर्ण वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करू शकतो. दयानंद शिक्षण संस्थेने उचललेले हे पाऊल नाविन्यपूर्ण तर आहेच त्यासोबतच विषाणूच्या प्रार्दुभावामुळे विद्यार्थ्यांचे खचलेले मनोबल वाढवणारे आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच आजच्या कालावधीत महत्त्वाचे ध्येय, आद्य कर्तव्य आहे. हे विचारात घेऊनच दयानंद शिक्षण संस्थेने लाखो रूपये खर्च करून, अशा अनेक यंत्रणांची व्यवस्था संस्थेद्वारे केली आहे. 


 या प्रसंगी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाशजी दरगड, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनीलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव, मुख्य लिपीक श्री. रमेश देशमूख, श्री. विकास खोगरे, श्री. गणेश पुजारी आदी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. 


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


 


Popular posts
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ! 'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
Image
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
दयानंद शिक्षण संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम !'दयानंद'चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image